30 नवी सेवा व 20 विक्री केंद्रे स्थापणार
नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी निस्सान इंडियाने येणाऱया काळात आपल्या व्यवसायात अधिक गतीमान होण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत सेवा पुरवण्यासाठी कंपनी 30 नवी सेवा केंद्रे आणि 20 विक्री केंद्रे सुरू करणार आहे. आपल्या नियोजीत दाखल होणाऱया मॅग्नाइट गाडीसाठी कंपनीने तयारीवर जोर दिला आहे. बाजारातील आपली बाजु अधिक भक्कम करण्यासाठी संपर्काचे जाळे वाढवण्यावर यापुढे कंपनीचा भर असणार आहे. डिजिटल व विक्रेत्यांमार्फत आवश्यक ती खबरदारी घेऊन ग्राहकांशी जास्तीत जास्त संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ग्राहकांना तणावमुक्त, आरामदायी, सुरक्षित आणि समाधान देणारी सेवा देण्यासाठी कंपनीने तयारी केली आहे. नजिकच्या काळात ग्राहकांना त्यांच्या कारसाठी 90 मिनीटात सर्व्हिस उपलब्ध करण्याचाही प्रयत्न असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गाडीच्या सर्व्हिसकरीता ऑनलाइन बुकिंग ग्राहकांना करता येणार आहे.