आयटी, शिक्षण क्षेत्राची आघाडीः 24 टक्के झाली वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ऑटो बाजारात सध्या निस्सान इंडियाची कामगिरी लक्षणीय होताना दिसते आहे. ऑगस्टच्या महिन्यात मागच्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत कंपनीने 296 टक्के इतकी भारतीय बाजारात वाढीव वाहनांची विक्री करण्यात यश मिळवले आहे. पण ही विक्री जुलैपेक्षा कमी आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीने 3 हजार 209 कार्सची विक्री केली आहे. जुलै 2021 मध्ये कंपनीच्या 8 हजार 156 वाहनांची विक्री झाली होती. निस्सान मॅग्नाईट या गाडीला चांगली मागणी होत असून 60 हजार जणांनी ही गाडी बुक केली आहे.