नवी दिल्ली
वाहन निर्माती कंपनी निस्सान इंडियाने दिलेल्या माहितीनुसार रेनो-निस्सान यांच्या भागीदारीसोबत सुरु असणाऱया चेन्नई प्रकल्पात एसयूव्ही मॅग्नाइटच्या 50,000 व्या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे.
मॅग्नाइटने देशातील आणि विदेशातील बाजारात त्याच्या ग्राहकांकडून जवळपास 1 लाखपेक्षा अधिकचे बुकिंग प्राप्त करुन लोकप्रियता सिद्ध केली आहे. मॅग्नाइट ही गाडी डिसेंबर 2020मध्ये भारतीय बाजारात आली होती.