नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नीट-पीजीची (NEET-PG) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी यासंबंधीची घोषणा केली. कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या 18 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विशेष मोहीम चालविली होती. परीक्षार्थींना कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसू नये यासाठीच ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.