एमबीबीएसचे विद्यार्थी करणार कोरोना रुग्णांवर उपचार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील आरोग्य व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी काही महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. नीट (NEET-PG) ही परीक्षा 4 महिने पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. परीक्षेची पुढील तारीख निश्चित करण्यापूर्वी किमान एक महिना अगोदर विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. इंटर्नशीप करणाऱया डॉक्टरांनाही आता कोरोनारुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बीएससी किंवा जीएनएम हे शिक्षण घेतलेल्या नर्सना देखील कोरोना काळात वरि÷ांच्या हाताखाली काम करण्यासाठी नेमण्यात येणार आहे. हे इंटर्न्स वरिष्ठ आणि तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहून कोरोना रुग्णांवर उपचार करतील.
पदव्युत्तर शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीही निवासी डॉक्टर्स म्हणून काम करु शकणार आहेत. डय़ुटीचे कमीतकमी 100 दिवस पूर्ण केल्यानंतर कोरोना काळात काम केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत प्राधान्य देण्यात येणार आहे. वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तसेच सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या इंटर्न्सची मदत घेतली जाणार आहे. यामुळे आता सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवरचा कामाचा ताण कमी व्हायला मदत होणार आहे. देशात सध्या कोरोनाचा कहर वाढत आहे. अशावेळी मनुष्यबळाचीही कमतरता भासू लागली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मनुष्यबळ वाढवण्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.