सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
146 हून अधिक नव्या जागांवर ‘विसंगती दूर करण्या’साठी नीट-पीजी 2021-22 प्रवेशांसाठी ‘ऑल इंडिया कोटा मॉप-अप’ टप्प्याचे कौन्सिलिंग सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केले आहे. या 146 जागा उमेदवारांसाठी मागील टप्प्यातील कौन्सिलिंगमध्ये उपलब्ध नव्हत्या आणि त्यांच्याकडे या जागांकरता कौन्सिलिंगमध्ये भाग घेण्याची संधी नव्हती.
न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, सूर्यकांत आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने 146 नव्या जागांवर कौन्सिलिंगसाठी विशेष टप्पा आयोजित करणे आणि दुसऱया टप्प्यात अखिल भारतीय कोटा किंवा राज्य कोटय़ात सामील होणाऱया विद्यार्थ्यांना यात भाग घेण्याची अनुमती दिली आहे. खंडपीठाने आरोग्य सेवा महासंचालकाला (डीजीएचएस) 24 तासांच्या आत विद्यार्थ्यांकडून पर्याय मागविणे आणि पर्याय मिळाल्यावर 72 तासांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्देश दिला.
घटनेचे कलम 142 अंतर्गत प्राप्त न्यायाधिकाराचा वापर करत सर्व निर्देश देण्यात आल्याचे खंडपीठाने स्पष्ट पेले आहे. नीट-पीजी 2021-22 कौन्सिलिंगच्या ‘मॉप-अप राउंड’मध्ये गुरुवारपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचा निर्देश खंडपीठाने यापूर्वी दिला होता.