क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात नीना स्पोर्ट्स संघाने आनंद अकादमीचा 5 गडय़ांनी, इंडियन बॉईज बेळगाव संघाने विजया क्रिकेट अकादमी बेळगाव संघाचा 7 गडय़ांनी तर स्पोर्ट्स अकादमी गदग संघाने श्री सिद्धारूड स्वामीजी हुबळी संघाचा 2 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. शिवू के. (गदग), केदार खटावकर (इंडियन बॉईज), अंगदराज हित्तलमनी (नीना) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजय क्रिकेट अकादमी संघाने 25 षटकात सर्व बाद 104 धावा केल्या. अखिलेश वेर्णेकरने 19, रोहन बेकवाडकरने 12, मनोज सुतारने 11, चिराग गोदवानी, सुजल कळसण्णावर यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. इंडियन बॉईज संघातर्फे केदार खटावकरने 40 धावात 5, गौस हाजी, फुरान मुल्ला यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईज संघाने 25 षटकात 3 बाद 107 धावा करून सामना सात गडय़ांनी जिंकला. त्यात परवेज मोरबने 5 चौकारासह 41 धावा केल्या. गौस हाजीने 3 चौकारासह 39 धावा केल्या. विजयातर्फे निलेश पाटीलने 2 तर चिराग गोदवानीने 1 गडी बाद केला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमी संघाने 50 षटकात 9 बाद 286 धावा केल्या. केतज कोल्हापुरेने 1 षटकार, 11 चौकारासह 82, झिशानअली सय्यदने 4 षटकार, 7 चौकारासह 77, किसन मेघराजने 49, राहुल नाईकने 20 तर नागेंद्र पाटील, मिथुन यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. नीनातर्फे अनिकेत लोहारने 55 धावात 3, नाशिर पठाणने 43 धावात 2, अंगदराज हित्तलमनीने 63 धावात 2, संतोष सुळगे पाटील व विनायक कांबळे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना स्पोर्ट्स संघाने 47.5 षटकात 5 बाद 290 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला त्यात अंगदराज हित्तलमनीने 9 चौकारासह 66, माजीद मकानदारने 4 चौकारासह नाबाद 60, संतोष सुळगे पाटीलने 8 चौकारासह नाबाद 64, कवीश मुक्कण्णावरने 6 चौकारासह 49, दर्शन पाटीलने 18, चेतन पांगिरेने 14 धावा केल्या. आनंदतर्फे वाहिद हंचनमनीने 72 धावात 3, आंsकार देशपांडे, केतज कोल्हापुरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स संघाने 46.3 षटकात सर्व बाद 195 धावा केल्या. विष्णू राजदुरमने 3 षटकार, 12 चौकारासह 83, सुरेश कुन्नूरने 23, अजय घोडकेने नाबाद 22, संतोष घोडकेने 20 धावा केल्या. स्पोर्ट्स अकादमी गदगतर्फे कार्तिकने 24 धावात 3, शिवू के.ने 36 धावात 2, शांतगौडा पाटीलने 39 धावात 2, देवेश, विनय व सचिन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्पोर्ट्स अकादमी गदग संघाने 35.5 षटकात 8 बाद 198 धावा करून सामना 2 गडय़ांनी जिंकला. निहालक्षने 7 चौकारासह नाबाद 56, शिवू के.ने 47, सचिनने 26, किरणने 20, शांतगौडा पाटीलने 11 धावा केल्या. सिद्धारूढतर्फे प्रशांतने 35 धावात 3, संतोषकुमार इरापूर व सुरेश कोन्नूर यांनी प्रत्येकी 2 तर विष्णूने 1 गडी बाद केला.