ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या भालाफेकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. अ गटातील पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
86.65 मीटर भालाफेकीसह नीरज अव्वलस्थानी राहिला. अ आणि ब गटातील पात्रता फेरीत 85.64 मीटर अंतरासह जर्मनीचा वेटर जॉन्सन दुसऱ्या स्थानी तर पाकिस्तानचा नदीम अर्शद 85.16 मीटर भालाफेकीसह तिसऱ्या स्थानी राहिला. 7 ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.