ऑनलाईन टीम / मुंबई :
नीरज चोप्राने पुन्हा एका दुखापतीतून सावरत कमबॅक केले आहे. नुकत्याच दक्षिण अफ्रिकेत पार पडलेल्या सेंट्रल नॉर्थ इस्ट स्पर्धेत त्याने 87.86 मीटर भालाफेक करत 2020 मधील ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले आहे.
ऑगस्ट 2018 मध्ये त्याने आशियाई स्पर्धेत 88.06 मीटर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण जिंकले होते. 2019 मध्ये झालेल्या दुखापतीनंतर नीरज चोप्राला बराच काळ स्पर्धेपासून दूर रहावे लागले होते. त्यानंतर त्याने दुखापतीतून सावरत कमबॅक केले आहे.
नीरज याने याबाबत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ‘दुखापतीतून् सावरत सराव स्पर्धा म्हणून सेंट्रल नॉर्थ इस्ट स्पर्धेत दाखल झालो. पहिल्या तीन थ्रोमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर चौथ्या प्रयत्नात आणखी दूर भालाफेक करण्याचे मी ठरवले आणि ऑलिम्पिकचे तिकीट पटकावले. या कामगिरीबद्दल मी आनंदी आहे.’