प्रतिनिधी /बेळगाव
नूतन पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी शनिवार दि. 1 जानेवारी रोजी सुत्रे स्वीकारली. त्यांच्यावर बेळगाव शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. नुतन आयुक्तांचा सत्कार बेळगाव बार असोसिएशन पदाधिकारी आणि वकिलांच्या हस्ते करण्यात आला. आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यतनट्टी, जनगल सेपेटरी गिरीश पाटील, ज्ये÷ वकील दिनकर शेट्टी यांच्यासह इतर वकील उपस्थित होते. बोरलिंगय्या हे 2008 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या गुप्तचर विभागात पोलीस प्रमुख म्हणून काम पहात होते. त्यांना डीआयजी पदावर बढती देवून बेळगाव पोलीस आयुक्त पदावर त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. बेळगाव शहरात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.