नृत्य परिषदेच्यावतीने रंगभूमी दिनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन परिषदेची माहिती देण्यात आली. नृत्य परिषदेच्या संपूर्ण राज्यातील कार्याला छत्रपतींनी आशीर्वाद दिला आणि भविष्यातील उपक्रमांसाठी भक्कम पाठिंबा दर्शविला. सातारा, सांगली, कोल्हापूर येथील सर्व सभासदांनी उपस्थिती दर्शविली.
पश्चिम महाराष्ट्र सचिव पंकज चव्हाण यांचे या प्रसंगी सहकार्य लाभले. पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सागर बगाडे, सातारा अध्यक्ष अक्षय सावंत ,कोल्हापूर अध्यक्ष दिपक बिडकर, सचिव रोहित पाटील महाराष्ट्र कार्यकारिणीचे रत्नाकर शेळके, आशुतोष राठोड आणि जतिन पांडे उपस्थित होते. सातारा नृत्य परिषदेच्या कार्यालयात रंगभूमी दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.