प्रतिनिधी / शिरोळ
नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील शाकंबरी मोबाईल व सुयोग पान, बेकर्स या दुकानाचे शटर्सचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शिरोळ पोलीसांनी चोवीस तासाच्या आत जेरबंद केले त्यांच्याकडून 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांतून मिळालेली सविस्तर माहिती अशी की श्रीक्षेत्र नरसिंह वाडी येथील फिर्यादी उदय दत्तात्रय जोशी यांच्या शाकंभरी मोबाईल शॉपी व सुयोग बेकर्स या दोन ठिकाणी बुधवारी रात्री दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून दुकानातील 22 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता.
गुन्हे शोध पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांनी दिला गुन्हेशोध पोलिसांच्या पथकाने खबऱ्या मार्फत चोरी प्रकरणातील आरोपीची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे नरसिंह वाडी येथील वैभव दिलीप वास्के वय वर्षे 19 व आशुतोष अतुल दळवी व सत्तावीस राहणार जैन बस्ती जवळ करून वाढ कुरुंदवाड या दोघांना सापळा रचून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले हिरो होंडा मोटरसायकल व चोरीस गेलेले मोबाईल असे 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
असून त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ ज्ञानेश्वर सानप पोलीस नाईक हनुमंत माळी पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल अमित पवार या पथकाने केली या संस्थेचे छोट्या कडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.