ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर आता नॅचरल गॅसही महागणार आहे. केंद्र सरकारने नॅचरल गॅसच्या किंमतीत तब्बल 62 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आता आणखी ताण पडणार आहे.
नॅचरल गॅस हा सीएनजी गॅस बनविण्यासाठी तसेच वीज निर्मिती आणि खतांच्या निर्मितीसाठीही वापरला जातो. ओएनजीसीसारख्या कंपन्या नामांकनाच्या आधारावर वाटप केलेल्या क्षेत्रातून उत्पादित नॅचरल गॅसची किंमत 2.90 डॉलर प्रति 10 लाख ब्रिटीश थर्मल युनिट होणार आहे. ही दरवाढ आजपासूनच पुढच्या 6 महिन्यांसाठी लागू होणार आहे. 2019 नंतर ही पहिलीच दरवाढ आहे.
या दरवाढीमुळे सीएनजी तसेच मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमध्ये पाईपने मिळणाऱया स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत 10 ते 11 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.