ऑनलाईन टीम / पुणे :
कन्सॉर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन (नवी दिल्ली ) आयोजित नॅशनल एज्यु राईट रिसर्च कॉम्पिटिशनमध्ये डॉ. बाळकृष्ण दामले यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.
या संशोधनपर निबंध स्पर्धेत डॉ. दामले यांनी ‘ऑन लाईन एज्युकेशन समोरील आव्हाने’ या विषयावर निबंध सादर केला होता.
डॉ. दामले हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशनल मल्टिमीडिया रिसर्च सेंटरमध्ये निर्माता संशोधक पदावर कार्यरत आहेत.