मुंबई
मारुती सुझुकी इंडियाच्या नेक्साअंतर्गत स्थापित शोरूम्सनी 6 वर्षे पूर्ण केली असून या कालावधीत 14 लाख वाहनांची विक्री करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. हा एक प्रकारचा विक्रमच असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मारूती सुझुकीने 2015 मध्ये नेक्सा या पहिल्या शोरूमची सुरूवात केली होती, ज्याअंतर्गत युवकांना मोठय़ा प्रमाणात आकर्षित केले होते. जवळपास 35 वर्षापर्यंतच्या नेक्साला भेट दिलेल्या जवळपास 70 टक्क्मयांहून अधिक जणांनी कार खरेदी करत शोरूम्सना प्रतिसाद दिला आहे. नेक्साअंतर्गत देशभरात 380 शोरूम्स कार्यरत आहेत.