वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय बाजारामध्ये आता सब-कॉम्पॅक्ट एसयुव्हीची मागणी वेगाने वाढते आहे. भारतामध्ये प्रत्येक वर्षाला या सेगमेंटमध्ये काही नवीन मॉडेल्स दाखल होत आहेत. इतकेच नाही, तर नवीन कंपन्या एसयुव्ही मॉडेल्स बाजारात आणत आहेत. एसयुव्ही गटातील टाटा नेक्सॉन आणि हय़ुंडाई पेटा यांची मागणी ही सलग वाढते आहे. नेक्सॉनचे उत्पादन 2 लाख युनिटवर पोहोचले आहे. तर पेटाने 6 लाख युनिटच्या विक्रीचा नवा टप्पा पार केला आहे.
टाटाने पुण्यातील प्रकल्पातून नेक्सॉनची 2,00,000 वी कार दाखल केली आहे. देशात कोरोना संकट असल्याच्या वातावरणातही लागू करण्यात आलेल्या बंदमुळे नेक्सॉनच्या 50,000 युनिटच्या उत्पादनासाठी टाटा मोटर्सला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. कंपनीकडून सदरचे मॉडेल 21 सप्टेंबर 2017 रोजी सादर करण्यात आले आहे.
वर्ष 2015 च्या सादरीकणानंतर क्रेटाने आतापर्यंत भारतामध्ये एकूण 6,06,743 युनिटची विक्री केली आहे. यामध्ये 3,99,787 युनिट डिझेल मॉडेल्सची विक्री झाली आहे. भारतीय बाजारामध्ये इतर कार्सच्या तुलनेत क्रेटा डिझेल मॉडेलची जोरदार विक्री झाली आहे. कंपनीने दुसरी आवृत्ती 16 मार्च 2020 रोजी सादर केली होती. ज्यामध्ये एप्रिल 2021 पर्यंत एकूण 1,39,204 युनिटची विक्री झाली आहे.
हय़ुंडाई क्रेटाची झेप
हय़ुंडाई क्रेटाही सर्वात प्रसिद्ध एसयुव्ही बनली आहे. 6 लाख युनिट इतक्या क्रेटाची विक्री करण्यात आली आहे.