नंदगड / वार्ताहर
एका कारला पाठीमागून येणाऱया दुसऱया भरधाव कारने ठोकर दिल्याने कारमधील बालक ठार झाल्याची घटना नेगिनहाळ (ता. बैलहोंगल) जवळ रविवारी घडली. या अपघातात आर्यन अनिल नेगनाळकर (वय 7, रा. नंदगड) हा जागीच ठार झाला. सोमवारी नंदगड येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. बालकाच्या अपघाती निधनाने सोमवारी दुपारपर्यंत नंदगड बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.