मडिवाळेश्वर मठाच्या परंपरेनुसार अंत्यविधी : अंत्ययात्रेवेळी भक्तांचा मोठा आक्रोश
प्रतिनिधी /बेळगाव
नेगिनहाळ (ता. बैलहोंगल) येथील श्री जगद्गुरु मडिवाळेश्वर शिवयोगी मठाचे मठाधीपती श्री बसवसिद्धलिंग स्वामीजी (वय 50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेनंतर बैलहोंगल तालुक्मयासह जिल्हय़ामध्ये खळबळ उडाली होती. आत्महत्या केलेल्या स्वामींवर मंगळवारी दुपारी नेगिनहाळ येथे लिंगायत धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भक्तांनी मोठा आक्रोश केला.
चित्रदुर्ग येथील प्रसिद्ध मुरघा मठाचे डॉ. शिवमूर्ती स्वामीजींना लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत अटक करण्यात आली आहे. याचा धक्का श्री बसवसिद्धलिंग स्वामीजींना बसला. त्यानंतर त्यांनी रविवारी रात्री 10.30 ते सोमवारी सकाळी 8 यावेळेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर साऱयांनाच मोठा धक्का बसला. स्वामींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बैलहोंगल तालुक्मयातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवागृहात नेण्यात आला. तेथून त्यांचा मृतदेह मठात आणून दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले.
प्रमुख मार्गांवरून अंत्ययात्रा
दुसऱया दिवशी मंगळवारी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अनेक भक्तांनी अंतिम दर्शन घेतले. अंत्यक्रियेवेळी भक्तांनी एकच आक्रोश केला. गावातील प्रमुख मार्गांवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. गल्लीमधून जाताना पुष्पवृष्टीदेखील करण्यात आली. मठाच्या आवारात लिंगायत धर्म व मडिवाळेश्वर मठाच्या परंपरेनुसार बसवसिद्धलिंग स्वामीजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भक्तांनी जय बसवेश्वर अमर रहे, अमर रहे, स्वामीजी अमर रहे, अशा घोषणा दिल्या.
अंत्यसंस्कारावेळी गरगा श्री गुरुमडिवाळेश्वर मठाचे चन्नबसव स्वामीजी, बैलूरचे निजगुणानंद स्वामीजी, होसूरचे गंगाधरा स्वामीजी, गदग डंबलाचे डॉ. सिद्धराम स्वामीजी, कुडलसंगमचे जयमृत्यूंजय स्वामीजी, यकुंडी पंचाक्षर स्वामीजी, उळवी बसवपीठाचे बसवप्रकाश स्वामीजी, बसवप्रभू स्वामीजी, अधरुद्धाजी स्वामीजी, सद्गुरु स्वामीजी, सिद्धराम स्वामीजी यांच्यासह मठसुखदेवानंद पुण्यश्रम, नयानगरचे अभिनव सिद्धलिंग स्वामीजी, माजी आमदार डी. बी. इनामदार, काँग्रेसचे नेते बाबासाहेब पाटील, जिल्हा पंचायतीच्या माजी सदस्या रोहिणी पाटील, आमदार महांतेश दोड्डगौडर, माजी आमदार डॉ. विश्वनाथ पाटील, विक्रम इनामदार, शंकर गुडास, याचबरोबर विविध पक्षांचे राजकीय नेते व ग्रामस्थ उपस्थित होते.