शहरात दोन दिवसापासून जैव वैद्यकिय कचरा साठला-पीपीई किटचा काळा बाजाराचा संशय
प्रतिनिधी/ गोडोली
प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासन सुस्त झाल्याने नेचर इन नीडवाले कोरोनाच्या प्रादुभार्वात ही वापरलेल्या पीपीई किटचा काळा बाजार करूपन मस्त वरकमाई करत असल्याचे प्रकरण गस्त घालणाऱया सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केले.जैव वैद्यकिय कचरातील पीपीई किटचा पुर्नवापर करण्याच्या रॅकेटमध्ये साताऱयातील नेचर इन नीड असल्याची भांडाफोड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा कोव्हीड सेंटर सह शहरातील खाजगी रूग्णालयांतील जैव वैद्यकिय कचरा न उचलल्याने मोंठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनाच्या संकटातून सावरणाऱया सामाजिक परिस्थितीला नेचर इन नीड व्यवस्थापनच्या नौटंकीमुळे पुन्हा अडचणीत आणले जात आहे.तरी ही प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस अद्याप ही दाखवले नाही.बडया हस्तींच्या वरदाहस्त असल्याने प्रशासकिय कारवाई होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते उघड बोलू लागले आहेत.
कोरोनाच्या प्रकोप कमकुवत होत असताना पीपीई किटचा पुन्हा वापर करण्यासाठी काळा बाजार होत असल्याचे उघड झाले आहे.साताऱयातील जैव वैद्यकिय कचऱयाची योग्य विल्हेवाट लावणाऱया नेचर इन नीड व्यवस्थापनच संशयाच्या भोवऱयात अडकले असून शहरातील काम बंद केल्याने गेली दोन दिवस सर्व रूग्णालयात वैद्यकिय कचरा मोठया प्रमाणावर साठला आहे.कोकण आणि पुण्यातील कचरा साताऱयात आणण्याची मुभा देणाऱया प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांकडून अनेक वेळा गलथान चुका करणाऱया बडयांचे पाठबळ असणाऱया नेचर इन नीड व्यवस्थापनावर कठोर कारवाई केली जात नाही.
जिल्हा कोव्हीड सेटरमध्ये रोज किमान 300 ते 500 किलो जैव वैद्यकिय कचरा नेचर इन नीड दिवसातून दोन वेळा घेऊन जात होते.मात्र पीपीई किटचा काळा बाजार उघड झाल्यापासून कर्मचाऱयांनी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता असल्याने काम बंद केले असल्याचे बोलले जाते.गेली दोन दिवसापासून खाजगी रूग्णालयातील जैव वैद्यकिय नेचर इन नीड वाल्यांकडून उचलला गेला नाही.तर जिल्हा कोव्हीड सेंटरचा कालपासून असा कचरा न उचलल्याने तो मोठया प्रमाणावर साठला आहे.या सर्वांकडून नेचर इन नीड व्यवस्थापनास संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात असून ही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही.
रूग्णालयातील बेड आणि कचऱयाच्या प्रमाणावर हजारो रूपये एप्रिलमध्ये आगाऊ रक्कम वसुल करणाऱया नेचर इन नीड व्यवस्थापन कोरोनाच्या प्रादुभावा काळात ही मनमानी कारभार करत आहे.याबाबत ना जिल्हा प्रशासन ना प्रदुषण नियंत्रण मंडळ ठोस कारवाई करताना दिसत नाही,हे संशयास्पद वाटू लागले आहे. नेचर इन नीडला पाठीशी घातले जात असून यामागे बडयांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.