प्रतिनिधी/सांगली
नेटकऱ्यांच्या समाचार नंतर अखेर ‘ढगात’ पोहचलेले सिनेमा शुटिंग थांबले. चित्रपट, मालिका यांचे चित्रीकरण बंद असताना जिल्ह्यातील एका प्रसिध्द संस्थेच्या चेअरमन यांनी एका मोठ्या संस्थेच्या डायरेक्ट यांच्या हवेलीवर रेटून शुटिंग सुरु ठेवले होते.पण नेटकऱ्यांनी या शुटिंगचा पर्दाफाश केला. यामध्ये थेट पालकमंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घालावे,अशी साद घातली होती.त्यास प्रतिसाद मिळून अखेर चित्रपटाचे शुटिंग थांबले.
जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत आहेत.आरोग्य यंत्रणेसह पोलीस रस्त्यावर उतरुन गर्दी रोखून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक सामाजिक संघटना हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. पण या ‘चेअरमन’ यांना आपण निर्मिती करीत असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवू वाटले नाही. आपल्या स्वभावानुसार त्यांनी तिथं देखील रेटारेटी केली.संचारबंदी काळात डायरेक्टर यांच्या बंद दरवाजा आड शुटिंग सुरु ठेवले. पण नेटकऱ्यांनी त्यांना पकडले. अखेर ‘ढगात’पोहचलेले हे शुटिंग ‘जमिनी’ वर आणावे लागले.