बेंगळूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या साऱयांनाच घरी राहण्याची सक्ती केली असल्याने अनेकजण ऑनलाइनच्या माध्यमातून घरातून काम करत आहेत. अनेकांनी सध्या इंटरनेटचा वापर वाढवलेला असून नेटफ्लिक्सनेही याचा फायदा उठवलेला पाहायला मिळतो आहे. एप्रिलच्या पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सच्या नव्या ग्राहकसंख्येत चांगली वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. या कालावधीत कंपनीने 15.77 दशलक्ष ग्राहक जोडले आहेत. यात 8.2 दशलक्ष नवे ग्राहक जोडले असून ही वाढ 10 टक्के गणली जात आहे. घरी राहून चित्रपट व मनोरंजन विश्वाशी जोडण्यासाठी कुटुंबीयांतील सदस्य रस घेत आहेत. त्यासाठी मासिक व वार्षिक शुल्क भरून अनेकजण या सेवेचा लाभ घेत आहेत. म्हणूनच अलीकडे नेटफ्लिक्स, ऍमेझॉनसारख्या कंपन्यांनी आपल्या जाहिराती जास्तीत जास्त प्रसारीत करण्यावर भर दिलाय. आता लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला असल्याने ग्राहकसंख्येत नजिकच्या काळात वाढ झाली तर नवल वाटायला नको.