वाळवा / वार्ताहर
गाव म्हटले की राजकारण आलेच, परंतु नागठाणे, ता. पलूस या गावांमध्ये मात्र राजकारण हा विषय नेहमी पंचक्रोशीमध्ये चर्चेला येत असतो. नागठाणे येथे ३२ लाख रुपये खर्च करून ग्रामसचिवालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे. पण पहीला टप्पा बांधकाम पूर्ण झालेल्या नागठाणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गेली दोन वर्षे पेंडिंग आहे. एका बाजूला ग्रामसचिवालयाची इमारत बांधून पूर्ण आहे. परंतु बांधकाम वेळी गावात अन्य ठिकाणी साध्या दुकानाच्या गाळ्यात ग्रामपंचायतीचे कार्यालय हालवले होते, ग्रामपंचायतीचे कामकाज करताना मीटिंग घेताना किंवा सरपंच-उपसरपंच सदस्यांना यांची बैठक होण्यासाठी मोठ्या अडचणी या ठिकाणी येत होत्या. एकाबाजूला इमारत बांधकाम पूर्ण झाले, परंतु तालुक्याच्या नेत्यांना, मंत्र्यांना या इमारतीचा विसर पडल्याने की काय उद्घाटन करायला वेळ नसल्याने त्यांनी त्यांचे दुर्लक्ष झाले. शेवटी गावकऱ्यांचीही गैरसोय होत होती. ग्रामस्थांच्या आग्रहामुळे लोकांच्या होणाऱ्या गैरसोयींमुळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या होणाऱ्या गैरसोयींमुळे सर्वांनी एकत्र येऊन आज ४ फेब्रुवारी रोजी इमारतीचे उद्घाटन एकत्र येऊन उद्घाटन केले.
सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी शंभर रुपये स्टॅम्पवर सह्या करून पुन्हा उदघाटन घेणार नाही. हा करार करण्यात आला. आता इमारतीचे उद्घाटन अधिकृत झाले असल्यामुळे पुन्हा इमारतीचे उद्घाटन होण्याची शक्यता आता नाही, या ग्रामपंचायत सचिवालय इमारत उद्घाटन समारंभासाठी स्वतः सरपंच जगन्नाथ थोरात, उपसरपंच रमिजा कोरबी, इंद्रजीत पाटील, कुमार शिंदे, सचिन देसाई, कोरबी, अलका यादव, वृषाली पाटील, योगिता शिंदे, निशा बनसोडे, अर्चना जाधव, सागर पाटील, नागनाथ मदने, विजय माने, दिपाली माने, लांडगे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.