ऍमस्टरडम / वृत्तसंस्था
क गटातील आणखी एका लढतीत नेदरलँडस्ने नॉर्थ मॅसेडोनियाचा 3-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला आणि साखळी फेरीअखेर अव्वलस्थान आणखी भक्कम केले. या विजयासह त्यांचे बाद फेरीतील स्थानही निश्चित झाले. नेदरलँडस्तर्फे मेम्फिस डेपेने 24 व्या मिनिटाला 1 गोल केला तर जॉर्जिनिओ विझ्नॅल्डमने 51 ते 58 या अवघ्या आठ मिनिटात 2 वेळा गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत या सामन्याला आणखी एकतर्फी स्वरुप दिले.