प्रचंड यांचा समर्थकांना राजीनाम्याचा निर्देश
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळने (माओवादी सेंटर) पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील स्वतःच्या मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. पक्षप्रमुख पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी स्वतःच्या खासदारांसाठी दुसऱयांदा अशाप्रकारचा निर्देश दिला आहे.
यापूर्वी शनिवारही प्रचंड गटाने स्वतःच्या गटातील सर्व मंत्र्यांना पुढील 24 तासांमध्ये भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. यात गृहमंत्री राम बहादूर थापा, ऊर्जा अन जलसपंदा मंत्री बहादुर रायामाझी, जलपुरवठा मंत्री मणिचंद्र थापा, शहरी कास मंत्री प्रभू शाह, क्रीडा तसेच युवा मंत्री दावा लामा तमांग आणि कामगारमंत्री गौरीशंकर चौधरी सामील आहेत.
फूट पडण्याची भीती
प्रचंड गटाने आतापर्यंत दोनवेळा स्वतःच्या मंत्र्यांना राजीनामा देण्याचा निर्देश दिला आहे. अशा स्थितीत मंत्र्यांची भूमिका पक्षविरोधी दिसून येत आहे. ओली सरकारमधील आमच्या गटाच्या मंत्र्यांचा राजीनामा देण्याचा विचार नसल्याचे वाटत असल्याचे प्रचंड यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य गणेश शाह यांनी म्हटले आहे. तर पंतप्रधान ओली प्रचंड गटाच्या नेत्यांना स्वतःसोबत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रचंड गटाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करण्यावरही चर्चा झाली आहे.
एनसीपीची मान्यता रद्द
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन (युएमएल) आणि पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर)च्या विलयाची मान्यता रद्द केली आहे. दोघांनीही 2018 मध्ये नेपाळ कम्युनिस्ट पक्ष (एनसीपी) स्थापन करण्यात आला होता.