वृत्तसंस्था/ भूतान
तीन संघांच्या टी-20 मालिकेचे यजमानपद नेपाळ भूषविणार आहे. सदर तिरंगी टी-20 मालिका 17 ते 24 एप्रिल दरम्यान खेळविली जाणार असून या मालिकेत यजमान नेपाळ, हॉलंड आणि मलेशिया यांचा समावेश आहे.
नेपाळमधील कीर्तीपूर येथे त्रिभूवन विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ही तिरंगी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेत प्रत्येक संघ दुसऱया संघाबरोबर दोनवेळा लढत देणार आहे. त्यानंतर आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. या मालिकेसाठी हॉलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. हॉलंड संघाचे नेतृत्व पीटर सिलेरकडे सोपविण्यात आले आहे. या संघामध्ये काही नवोदितांचा समावेश करण्यात आला आहे.