संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्यास विरोध
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळचे दोन माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ आणि माधव कुमार नेपाळ यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्याच्या विरोधात रविवारी धरणे आंदोलन केले आहे. नेपाळमध्ये राजकीय संकट आता दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. अलिकडेच नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पक्षातून हाकलण्यात आले आहे.
मागील वर्षी 22 डिसेंबर रोजी ओली यांना कम्युनिस्ट पक्षातील सह-अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. तर ओली यांनी 20 डिसेंबर रोजी संसदेचे सभागृह विसर्जित केले हेते. ओली यांच्या या निर्णयामुळे देशातील लोकशाहीप्रणाली धोक्यात आल्याचा आरोप प्रचंड यांनी केला आहे. नेपाळमध्ये यापूर्वीही राजकीय संकट निर्माण झाले होते. पण त्यादरम्यान चीनच्या मदतीने नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरकार तरले होते. परंतु यावेळी चीनने ओली यांच्यावरील कृपादृष्टी हटविली आहे.