वृत्तसंस्था/ चेन्नई
कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 12 व्या फेरीनंतर इयान नेपोमनियाचीने वांग हाओचा पराभव करून 8 गुणांसह अग्रस्थान कायम राखले तर फॅबियानो कारुआना व अनिश गिरी यांच्यात त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी होण्यासाठी चुरस असेल.
या फेरीत अनिश गिरीने कारुआनावर विजय मिळवित दुसरे स्थान मिळविले आहे. तो नेपोमनियाचीपेक्षा केवळ अर्ध्या गुणाने मागे आहे. या स्पर्धेच्या उत्तरार्धातील टप्प्यात पहिला विजय मिळविताना मॅक्झिम व्हॉशियर लॅग्रेव्हने किरिल ऍलेक्सीनोचा पराभव केला. अलेक्झांडर ग्रिस्चुकलाही ओपनिंगमुळे निर्माण झालेल्या अडचणीवर मात करता आली नाही आणि त्याला डिंग लिरेनकडून पराभव पत्करावा लागला. फिडेच्या या कँडिडेट्स स्पर्धेत पहिल्यांदाच चारही सामने निकाली ठरले.