अग्निशमन दलाचे 7 जवान जखमी
ऑनलाईन टीम / मुंबई :
नेरुळच्या सेक्टर 44 मधील पामबीचरोडजवळ असलेल्या सीहोम्स इमारतीला आज सकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग विझविताना अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पामबीचरोड लगतच्या सीहोम्स या इमारतीच्या 20 आणि 21 व्या मजल्यावर आज सकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. त्या फ्लॅटमध्ये आग लागली तो फ्लॅट बंद होता. त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ांसह 60 जवान घटनास्थळी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग विझविताना अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.