प्रतिनिधी / सातारा
रेशनिंग आणावयास दुचाकीवरून निघालेल्या युवकास समोरून आलेल्या डंपरने धडक दिल्याने युवक जखमी झाल्याची घटना नेले (ता. सातारा) येथे रविवारी सकाळी 9.30 वाजता घडली. आयुष इंगवले (वय 18, रा. किडगाव, ता. सातारा) असे त्या जखमी युवकाचे नाव असून तो बारावीत शिकतो आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.