प्रतिनिधी /वास्को
दाबोळी येथील नेव्हल एव्हिएशन म्युझीयमचा आज 12 रोजी 23 वा वर्धापनदिन आहे. या म्युझियमचे उद्घाटन 12 ऑक्टोबर 1998 रोजी नौदलाचे पहिले पायलट ऍडमिरल आर एच ताहीलियानी (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले होते. ऍडमिरल ताहिलियानी हे आयएनएस विक्रांत या युद्धनौक्sवर हॉकर सी हॉक लढाऊ विमान उतरविणारे पहिले पायलट होते.
दाबोळीतील नेव्हल एव्हिएशन म्युझियम आशिया खंडातील एकमेव संग्रहालय असून या संग्रहायलाच्या कालांतराने विस्तार होत गेला. सध्या या संग्रहालयात 14 प्रकारची हवाई जहाजे आहेत. या संग्रहालयात ऐतिहासिक सुपर कॉन्स्टेलेशन विमानांचे जतन करण्यात आले आहे. ज्यामुळे भारतीय नौदलाला हवाई दलाकडून सागरी गस्तीची जबाबदारी पार पाडण्यास मदत लाभली आहे.
या संग्राहालयात नौदलाच्या हवाई प्रवासाची ऐतिहासिक माहिती, 1971 च्या भारत-पाक युद्धा दरम्यानच्या हवाई ऑपरेशनची माहिती, वैमानिक व विविध विमानांसह संग्रहाचा विस्तार करण्यात आला आहे. देश सेवेसाठी बलिदान दिलेल्या पुरूष व महिलांना समर्पित म्हणून एक स्मारक कक्ष या ठिकाणी उभारण्यात आला आहे. हवाई शस्त्रांचे प्रदर्शन, भारतीय नौदलाच्या हवाई स्टेशन व हवाई पथकांचा इतिहास या म्युझियममध्ये असून एक मीनी थिएटरही आहे.
या मुझियमध्ये विद्यार्थी, हवाई प्रवासी, पर्यटक व स्थानिक नागरिक भेटी देत असतात. या संग्रहालयाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आज या म्युझीमयचा 23 वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे.