वृत्तसंस्था/ लंडन
कोरोना व्हायरस प्रसारामुळे इंग्लंडमधील इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱया सरे संघाने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल नेसर बरोबरचा करार रद्द केला आहे.
इंग्लंडमध्ये कोरोनाच्या महामारीने भीषण स्थिती निर्माण केली आहे. कोव्हिड-19 फैलाव या देशामध्ये झपाटय़ाने होत असल्याने सर्व क्रीडास्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आला आहे. इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेला जुलैमध्ये प्रारंभ होणार असला तरी कोरोना व्हायरसमुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय औपचारिकरित्या घेण्यात आला आहे. इंग्लंडमधील सर्व व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा 28 मेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.