बेंगळूर
समानतेच्या दृष्टीकोनातून एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी नेस्लेने नुकतीच महिलांची संख्या वाढवली असल्याचे समजते. कंपनीत सद्यस्थितीत काम करणाऱया महिलांचे प्रमाण आता 23 टक्के इतके असल्याचे कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन यांनी सांगितले. भारतात 2015 साली पदार्पण केले त्यावेळी महिला कर्मचाऱयांचे प्रमाण 15 ते 16 टक्के इतके होते. आता प्रमाण 23 टक्के झाले असून लवकरच 9 वा प्लांट सुरू होत आहे. सध्याला 7700 इतकी कर्मचाऱयांची संख्या आहे.