बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने देसूर येथील गुडस्शेड रोड परिसरातील कामगार वर्गाला जीवनावश्यक सामग्रीचे वितरण करण्यात आले. या सामग्रीमध्ये तांदूळ, पीठ, तेल, तूरडाळ, मीठ, तिखट, साबण आदींचा समावेश होता. सदर मदत वितरणासाठी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकारी संघटनेचे सहकार्य लाभले होते. यावेळी रेल्वेचे विभागीय साहाय्यक अभियंता हिसामुद्दीन, व्यवसाय व्यवस्थापक जे. पी. समाल व इतर अधिकारी उपस्थित होते.