प्रत्येक सहा महिन्याला करण्यात येते किंमत निश्चिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नैसर्गिक गॅसच्या किमतीमध्ये मंगळवारी 26 टक्क्मयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे गॅसच्या किमती 2014 मध्ये असलेल्या भावावर पोहोचला आहे. 2014 मध्ये ही गॅसच्या दरासाठी एक आराखडा निश्चित करण्यात आला होता. गॅसच्या किमती घटल्या म्हणजे सरकारी कंपन्यांकडे कमी किमतीत गॅस उपलब्ध होते. याचा साधा सोपा अर्थ आहे, ओएनजीसी सारख्या गॅस उत्पादन कंपन्यांच्या उत्पन्नात मोठी घसरण होण्याचे संकेत निर्माण होय. याचा अंदाज बांधून सीएनजी आणि पाईपच्या आधारे पुरवठा होणाऱया गॅसच्या किमतीत कपात होणे होय.
प्रत्येक सहा महिन्यानंतर गॅसच्या किमती निश्चित करण्यात येतात. प्रत्येक 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरमध्ये या संदर्भात संशोधन करुन हा निर्णय घेण्यात येतो. या संशोधनाचा उपयोग उर्वरक आणि वीज निर्मितीसाठी करण्यात येतो. यामुळे वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱया सीएनजी आणि घरगुती वापरात येणारा गॅस तयार केला जातो.
आगामी सहा महिन्यातील किमती
पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिग ऍण्ड ऍनालिसिस सेल (पीपीएसी) यांनी सांगितले आहे, की देशातील अधित्तर गॅसची किमत 1 एप्रिलपासून आगामी 6 महिन्यापर्यंत 2.39 डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (एमबीटीयू) होणार आहे. या अगोदरच्या सहा महिन्यात ही किमत 3.23 डॉलर होती. मागील सहा महिन्यात सलग दुसऱयांदा गॅसच्या किमती घट करण्यात आली आहे.