टेक्सास
स्मार्टफोन बनवणारी चिनी कंपनी वनप्लसने आपले नॉर्ड एन 100 आणि नॉर्ड एन 10 5जी हे दोन स्वस्त स्मार्टफोन्स बाजारात दाखल केले आहेत. दोन्ही फोन्स अत्यंत किफायतशीर किंमतीत उपलब्ध करण्यात आले असून हे फोन्स भारतात दाखल करण्याबाबतची तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार वन प्लस नॉर्ड एन 100 ची किंमत 17 हजार 230 रुपये आणि वन प्लस नॉर्ड एन 10 ची किंमत 31 हजार 740 रुपये असणार असल्याचे समजते. हे फोन्स सध्या अमेरिकेतील बाजारात दाखल करण्यात आले आहेत.