वृत्तसंस्था/ गॅस्टेड
एटीपी टूरवरील येथे झालेल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय गॅस्टेड क्लेकोर्ट टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रूडने एकेरीचे जेतेपद मिळविताना फ्रान्सच्या गॅस्टोनचा पराभव केला.
रविवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रूडने गॅस्टोनचा 6-3, 6-2 असा पराभव केला. एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत रूड सध्या 14 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत रूडने सर्बियाच्या सातव्या मानांकित डिजेरचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. क्ले कोर्टवरील स्पर्धेतील रूडचे हे तिसरे जेतेपद आहे.