ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नोएडामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या 78 टक्के रुग्णांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. नोएडा सेक्टर-39 च्या कोविड-19 रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रेणू अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अग्रवाल म्हणाले, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांच्या रक्तात गुठळ्या होतात. त्यामुळे ‘हृदयविकारा’चा धोका वाढतो. नोएडामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्येे 78 टक्के रुग्णांचे मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात कोविड-19 च्या संसर्गामुळे गुरुवारपर्यंत 285 जणांचा मृत्यू झाला आहे. नोएडामध्ये गेल्या तीन आठवड्यांत सुमारे 175 लोकांचा मृत्यू झाला आहे.