ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिल्लीत चिंताजनक स्थिती आहे. त्यातच एनसीआरमध्ये गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबाद मधील एका रुग्णांवर नोएडातील सेक्टर 137 मधील रुग्णालयात उपचार सुरू होते. येथील जिल्हा पाहणी अधिकारी सुनील दोहरे यांनी सांगितले की, गाझियाबादमधील खोडा कॉलनी येथे राहणाऱ्या काही दिवसापूर्वी नोएडा सेक्टर 24 मधील कामगार रुग्णालयात दाखल केले होते.
त्यानंतर या रुग्णाची परिस्थिती खालावल्याने त्याला सेक्टर 137 मधील फ्लिक्स रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याची कोरोनाची चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
दरम्यान, त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे.