काँग्रेस उमेदवारासाठी मागितली मते
उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांनी सोमवारी पक्ष उमेदवार पंखुडी पाठक यांच्यासाठी प्रचार केला आहे. यादरम्यान त्यांनी अनेक भागांमध्ये जात मते मागितली आहेत. एका वस्तीत जात त्यांनी जनसंपर्क देखील केला. तीन दशकांनंतर आम्ही उत्तरप्रदेशात 403 जागा लढवत आहोत. जातीयवाद आणि सांप्रदायिकात फैलावल्याने काही राजकयी पक्षांना लाभ होतो, जनतेचे यात नुकसान होते. याचमुळे लोकांनी विकास करणाऱया लोकप्रतिनिधीची निवड करावी असे त्या म्हणाल्या.
आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, उद्योगजगताशी संबंधित लोक, फ्लॅट बायर असोसिएशन, शेतकरी, महिला, स्टार्टअपशी निगडित महिलांशी त्यांनी संवाद साधला आहे. विविध रोजगारांसाठी आम्ही एक जॉब कॅलेंडर तयार करू आणि तरुणाईला कशाप्रकारे नोकरी देऊ हे सांगू असे प्रियंका यांनी म्हटले आहे. नोएडामध्ये स्वतःच्या प्रचारमोहिमेची सुरुवात प्रियंका यांनी कालीबाडी मंदिरात पूजा करून केली आहे. नोएडामध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पुत्र पंकज सिंह भाजपचा उमेदवार आहे.
काँग्रेस उमेदवार पंखुडी पाठक या नोएडामध्sय राहतात, त्यांना येथील लोकांच्या समस्यांची जाणीव आहे. संकटावेळी त्या लोकांसोबत उभ्या राहतात. भाजप केवळ रोजगाराचे आश्वासन देत आहे. तर आम्ही याकरता ब्ल्यूप्रिंट तयार केला आहे. भाजप देशात जातीयवाद आणि धार्मिक उन्माद फैलावून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांनी जागरुक व्हावे आणि कुठल्या प्रकारचा नेता हवा याचा विचार करावा असे प्रियंका यांनी म्हटले आहे.