कोरोनामुळे विविध क्षेत्रांमध्ये मंदीचं वातावरण आहे. याच कारणामुळे बर्याच कंपन्यांनी कर्मचारी कपात, वेतन कपातीसारखे मार्ग अवलंबले आहेत. मात्र काही कंपन्या नव्या कर्मचार्यांची नियुक्ती करत आहेत. तुम्हीही नवी संधी साधण्याच्या विचारात असाल तर काही बाबींकडे लक्ष द्यायला हवं.
* सध्याच्या नोकरीपेक्षा अधिक चांगली ऑफर मिळत असेल तर ती स्वीकारायला हरकत नाही. मात्र त्याआधी संबंधित कंपनीची सगळी माहिती घ्या. कंपनी तोटय़ात किंवा आर्थिक संकटात नसल्याची खात्री केल्यानंतरच पुढे जा.
* सध्याच्या नोकरीत फारशी अडचण नसल्यास तसंच पगार वेळेवर मिळत असल्यास नोकरी बदलण्याचा विचार पुढे ढकलणं योग्य ठरेल.
* ऑफिसमधलं वातावरण खेळकर आणि उत्साही असायला हवं. तुमच्या ऑफिसमध्ये चांगलं वातावरण असल्यास नोकरी बदलू नका. नव्या कंपनीतल्या संधी तसंच वातावरणाविषयी जाणून घ्या.
* कामातून आनंद मिळायला हवा. वाढीव पगार मिळतोय म्हणून कोणतंही काम स्वीकारू नका. नव्या कंपनीत तुमच्या आवडीचं काम असेल तरच विचार करा. अर्थात पडेल ती जबाबदारी स्वीकारायची आणि नव्या गोष्टी शिकण्याची तयारी असायला हवी. नोकरी मिळण्यात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे संपर्काचा आवाका वाढवा. विविध साईट्सवर सीव्ही अपलोड करून ठेवा. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांच्या संपर्कात राहा.