नवी दिल्ली
नोकिया अंतर्गत येणाऱया फोन्स एचएमडी ग्लोबलने नवा नोस्टाल्जीक 5310 म्युझिक फोन बाजारात उतरवला आहे. एमपी थ्री प्लेयर व एफएम रेडियोच्या (वायर व वायरशिवाय) सुविधेसह, शक्तीशाली डय़ूअल फ्रंट स्पीकरची सोय फोनमध्ये असेल. 16 जूनपासून फोनचे बुकिंग करता येणार आहे. नोकिया डॉट कॉम फोन्स वा ऍमेझॉन डॉट इन वर फोन बुक करता येईल. या दोन्ही पोर्टलवर 23 जूनपासून फोन विक्रीला उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत 4 हजार रुपये असणार आहे. याची बॅटरीही दीर्घकाळ चालणारी आहे. एक्स्प्रेस म्युझिकसह हा फोन संगीताची मेजवानी ग्राहकांना सादर करेल.