नवी दिल्ली
मोबाईल निर्मितीच्या कार्यक्षेत्रात असणाऱया नोकिया कंपनीने दोन नवे किफायतशीर किमतीतील स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. नोकिया 2.4 आणि नोकिया 3.4 हे दोन मोबाईल फोन्स कंपनीने बाजारात उपलब्ध केले आहेत. यातील 3.4 या स्मार्टफोनला 3 रियर कॅमेरे आहेत तर दुसऱया मोबाईलला डय़ुअल रियर कॅमेरे व वॉटर ड्रॉप स्टाईल डिस्प्ले नॉचची सोय आहे. कंपनी येणाऱया काळात नवे परवडणारे फोन सादर करण्याबरोबरच सेवा विस्तारावरही भर देणार आहे. नोकिया 3.4 स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे, ज्याची किंमत 13 हजार 677 रुपये असणार आहे. 2.4 नोकिया फोनची किंमत 10 हजार 236 रुपये इतकी असणार आहे.