ऑनलाईन टीम / लंडन :
समुद्री शेवाळांपासून तयार करण्यात आलेला नोजल स्प्रे कोरोना रोखण्यास मदत करतो, असा दावा ब्रिटनच्या संशोधकांनी केला आहे. ब्रिटनच्या स्वानसी युनिव्हर्सिटीने हा स्प्रे तयार केला आहे.
सर्दी आणि फ्लू सारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना हा स्प्रे प्रभावी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हे औषध कोरोनावर किती प्रभावी आहे, याबाबतच्या चाचण्या करण्यात येत आहेत. ब्रिटनमधील 480 स्वयंसेवकांवर या नोजल लसीची चाचणी सुरू असून, या नोजल स्प्रेची किंमत 5.99 युरो म्हणजेच 531.76 रुपये आहे. या स्प्रेमध्ये कॅरेटेलोज, आईऔट-कॅरेजेननचे एक पेटेंट आणि समुद्री शेवाळांचा वापर करण्यात आला आहे.
ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या चाचण्यांमधून सकारात्मक निष्कर्ष आल्यास कोरोनाविरोधातील लढाईत पर्यायी औषध म्हणून याचा वापर करता येईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.