वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा युवा फुटबॉलपटू जेम्स नोरिस लिव्हरपूल एफसी संघाशी पहिला व्यावसायिक करार केला आहे. 9 वर्षाखालील वयोगट स्तरावर तो या क्लबमध्ये सामील झाला होता आणि प्रगती करीत आता इंग्लंडचा युवा आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला आहे.
17 वर्षीय नोरिस यू-18 संघातून या मोसमाची सुरुवात केली असली तरी नंतर तो यू-23 संघातूनही खेळू लागला. गेल्या डिसेंबरमध्ये त्याला ऍस्टन व्हिलाविरुद्धच्या काराबाव कप उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. गेल्या फेब्रुवारीत लिव्हरपूलच्या युवा संघाने जिंकलेल्या एफए चषकातील शूसबरी टॉऊनविरुद्धच्या सामन्यात मात्र त्याला बेंचवर बसावे लागले होते. या क्लबच्या यू-19 युफा युवा लीग संघातील मात्र तो नियमित खेळाडू बनला आहे.