ऑनलाईन टीम / लंडन :
कोरोना संपत नाही तोच ब्रिटनमध्ये ‘नोरो’ विषाणूची एन्ट्री झाली आहे. या विषाणूने कोरोनाप्रमाणेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ब्रिटनसह जगाची चिंता वाढली आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत नोरो विषाणूचे 154 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) म्हटले आहे की, कोरोना विषाणूपेक्षा नोरो विषाणू जास्त धोकादायक आहे आणि यामुळे संसर्ग वेगाने पसरतो.
अतिसार, उलट्या, चक्कर येणे आणि ओटीपोटात तीव्र वेदना होणे ही या विषाणूची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय बर्याच रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखीची लक्षणे दिसतात. या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर 12 ते 48 तासांच्या आत हा संसर्ग पसरतो. नोरो विषाणूला पोटाचा फ्लू असेही म्हटले जाते.