देशातील बाजारात हिरो मेटोकॉर्पची बाजी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्पने देशातील वाहन बाजारामध्ये मागील महिन्यातील दुचाकी वाहनांची सर्वात मोठी निर्मिती कंपनी असल्याचे सिद्ध केले आहे, कारण कंपनीने जवळपास 5,75957 युनिटसह 13.8 टक्क्यांची वार्षिक पातळीवर वाढीसोबत विक्री केल्याची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकी उद्योगात एकूण विक्रीचा विचार केल्यास नोव्हेंबर 2019 मध्ये 14,10,939 युनिट्सच्या तुलनेत यामध्ये 16 लाखपेक्षा अधिक युनिटची विक्री केल्याची नोंद करण्यात आली असून यामध्ये 13.4 टक्क्यांची वृद्धी पहावयास मिळाली आहे.
नोव्हेंबर विक्रीत पहिल्या दहामध्ये हिरोची स्प्लेंडर, एचएफ डिलक्स आणि पॅशन यांनी स्थान पटकावलंय.सर्वाधिक विक्री होणाऱया दुचाकीमध्ये होंडा, बजाज आणि टीव्हीएसची दोन वाहने तसेच सुझुकी सर्वाधिक विक्रीत टू-व्हीलर ऍक्सेस 125 ने स्थान पक्के केले आहे.
नोव्हेंबर 2020 मधील दुचाकी सेलची स्थिती
रँक | मॉडेल | नोव्हेंबरची विक्री |
1 | हिरो स्प्लेंडर | 2,48,398 |
2 | होंडा ऍक्टिव्हा | 2,25,822 |
3 | हिरो एचएफ डिलक्स | 1,79,426 |
4 | बजाज पल्सर | 1,04,904 |
5 | होंडा सीबी शाइन | 94,413 |
6 | टीव्हीएस एक्सएल | 70,750 |
7 | टीव्हीएस ज्युपिटर | 62,626 |
8 | हिरो पॅशन | 53,768 |
9 | सुझुकी ऍक्सेस | 45,582 |
10 | बजाज प्लॅटिना | 41,572 |