नवी दिल्ली : विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी (एफपीआय इन नोव्हेंबर) नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱया महिन्यांमध्येही भारतीय बाजारात निव्वळ गुंतवणूक कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. एफपीआयने नोव्हेंबर महिन्यात भारतीय बाजारात निव्वळ स्वरुपात 62,951 कोटी रुपये गुंतवले आहेत. सदर आकडेवारीच्या मजबूतीने एफपीआयने शेअर बाजारात नव्या विक्रमांची नोंद केली आहे. ठेवींच्या आकडेवारीनुसार एफपीआयाने नोव्हेंबरमध्ये समभागांमध्ये निव्वळ गुंतवणूक ही 60,358 कोटी रुपयाची झाल्याची माहिती दिली आहे. दुसऱया बाजूला बॉण्ड बाजार (डेट ऍण्ड बॉण्ड मर्केट) याच्या आधारे 2,593 कोटी रुपयाची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. नोव्हेंबर 03 ते 37 या कालावधीत एफपीआयने भारतीय बाजारात निव्वळ स्वरुपात 62,951 कोटी रुपयाची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेडकडूनही एफपीआयची आकडेवारी उपलब्ध करुन देत आहे. अधिकची गुंतवणूक बँकिंग क्षेत्राची मोठय़ा कंपन्यांनी गुंतवणुकीचा कल भारताकडे ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक ही बँकिंग क्षेत्राची असल्याचे ग्रो चे सहसंस्थापक आणि सीओओ हर्ष जैन यांनी दिली आहे.
Previous Articleसांगली : इराणचा नवाझ अली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.