प्रतिनिधी /बेळगाव
नोव्हेंबर महिन्यात दिवाळी तसेच इतर कार्यक्रम असल्याने अनेक सुटय़ा आल्या आहेत. या महिन्यात साप्ताहिक सुटय़ा व इतर सुटय़ा मिळून 10 दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. यामुळे 30 दिवसांपैकी केवळ 20 दिवस सरकारी कार्यालयांचे कामकाज चालणार आहे. यामुळे ज्यांना सरकारी कार्यालये तसेच बँकांमध्ये कामे आहेत त्यांना आधीच नियोजन करावे लागणार आहे.
1 नोव्हेंबर रोजी राज्योत्सव असल्याने कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. दि. 3 रोजी नरकचतुर्दशी, 5 रोजी बलिप्रतिपदा, 7 रोजी रविवार, 13 रोजी दुसरा शनिवार, 14 रोजी रविवार, 21 रोजी रविवारची साप्ताहिक सुटी, 22 रोजी कनकदास जयंती, 27 रोजी चौथा शनिवार तर 28 रोजी साप्ताहिक सुटी असणार आहे.
सरकारी कार्यालयांसोबतच सरकारी, खासगी, सहकारी बँका व सोसायटय़ादेखील बंद राहणार आहेत. याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर होण्याची शक्मयता आहे. पहिल्याच आठवडय़ात तीन सुटय़ा असल्याने दिवाळीसाठी खरेदी करणाऱयांना त्यापूर्वीच पैशांचे नियोजन करावे लागणार आहे.