प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हÎातील 11 कोव्हॅक्सिन केंद्रांवर शनिवारी लस टोचणीसाठी आशा स्वयंसेविका, परिचारिकांनी गर्दी केली. दुपारपर्यत 60 टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले होते. कोरोना योद्धÎांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या मोहिमेला प्रारंभ झाला. कोरोना प्रतिबंधक लस टोचणीला सुरूवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी `नो रिऍक्शन’ असे स्पष्ट करत कोरोना योद्धÎांनी मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केंद्रांना भेटी दिल्या. सर्व केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले.
सेवा रूग्णालयात लसिकरणासाठी आशा स्वयंसेविकांची रांग
लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयात शनिवारी सकाळी 11 वाजता आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, सहायक आरोग्य उपसंचालक डॉ. उज्वला माने, सीपीआरच्या बाहÎ संपर्क अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम, जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. फारूक देसाईंंच्या उपस्थितीत कोरोना योद्धÎांच्या हस्ते दीप्रज्वलनाने लसीकरणाला प्रारंभ झाला. जिल्हÎातील पहिली लस परिचारिका अक्षता माने यांनो येथे देण्यात आली. येथे लसिकरणासाठी आशा स्वयंसेविकांची रांग लागली होती.
कोरोना योद्ध्यांच्या हस्ते लसिकरणास प्रारंभ, लसिकरण
सीपीआर हॉस्पिटलमधील कोयना बिल्डींगमधील लसीकरण केंद्रात आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय बर्गे यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरूवात झाली. येथे हृदय शस्त्रक्रिया विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अक्षय बाफना यांना प्रथम लस देण्यात आल्याची माहिती सीपीआर हॉस्पिटलमधून देण्यात आली.
सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील आरोग्य केंद्रांत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते धंन्वतरी प्रतिमा पूजनाने मोहिमेला शहरात प्रारंभ झाला. येथे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, डॉ. मोमीन उपस्थित होत्या. राजारामपुरी नागरी आरोग्य केंद्र, महाडीक वसाहत नागरी आरोग्य केंद्र, सदर बाजार येथील नागरी आरोग्य केंद्रांत कोरोना योद्धÎांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सुरूवात झाली.
लसीकरण केद्रांमध्ये रांगोळीद्वारे जनजागृती
शहर आणि परिसरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिनसंदर्भात आकर्षक रांगोळÎा रेखाटल्या होत्या. कोरोना प्रतिबंधक त्रिसुत्रीची माहिती मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता यांच्या चित्रांद्वारे रांगोळीतून देण्यात आली. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, राजारामपुरी, महाडीक वसाहत, सदर बाजार येथील केंद्रांत हे चित्र पहायला मिळाले. सीपीआर हॉस्पिटल, सेवा रूग्णालय परिसरही आकर्षक रांगोळÎांनी फुलून गेला होता.
प्रत्येक केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक त्रिसुत्रीची अंमलबजावणी
प्रत्येक केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी केली होती. तसेच प्रतिक्षा कक्ष, लाभार्थ्याची फोटो आयडी प्रुफ तपासणी, नोंदणी, केव्हॅक्सिन ऍपमध्ये व्हेरीफिकेशन, वेद्यकीय तपासणी अन् लस टोचणी कक्ष अशी यंत्रणा होती. निरीक्षण कक्षात दोन बेड, व्हेटिलेटर, वैद्यकीय अधिकारी तैनात होते.
लसीकरण केंद्रांवर दुपारपर्यत 50 हून अधिक जणांना लस
शहरातील महाडीक माळ आणि सदर बाजार येथील केंद्रांवर दुपारपर्यत 58 आणि 52 जणांना लस दिली. सेवा रूग्णालयात ही संख्या सत्तरवर होती. निरीक्षण केंद्रांत गर्दी होती. परिचारिका, आशा स्वयंसेविकांनी `नो रिऍक्शन’ म्हणत लसिकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.