वृत्तसंस्था/ चेन्नाई
अमेरिकेतील मियामी येथे झालेल्या हेमपेल विश्व चषक नौकानयन मालिकेत भारताची महिला नौकानयनपटू नेत्रा कुमाननने दुसऱया टप्प्यात कांस्यपदक पटकाविले. विश्वचषक नौकानयन स्पर्धेत पदक मिळविणारी नेत्रा ही पहिली भारतीय महिला नौकानयनपटू आहे.
या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या इरिका रिनेकीने सुवर्ण तर ग्रीसच्या केराचेलीओने रौप्यपदक आणि नेत्रा कुमाननने कास्यपदक मिळविले. 2014 आणि 2018 च्या आशियाई स्पर्धेत नेत्राने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. अबु धाबीत 15 ते 22 मार्च दरम्यान होणाऱया ऑलिंपिक पात्रतेसाठीच्या आशियाई नौकानयन स्पर्धेत सहभागी होणार आहे.